शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनासाठी गोळा केल्या ४५० विविध वृक्षांच्या बिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 16:20 IST

वाशिम : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल्च्या राष्ट्रीय हरित सेनेचा चिमुकला सुरज याने विविध वृक्षांच्या ४५०  बिया जमा करुन एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल्च्या राष्ट्रीय हरित सेनेचा चिमुकला सुरज याने विविध वृक्षांच्या ४५०  बिया जमा करुन एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा झपाट्याने ºहास होत आहे . बदलेले ऋतुचक्र , तापमानात झालेला बदल , अवकाळी पाऊस , गारपीट ,अस्मानी सुल्तानी संकट हे जगावर घोंघावत असलेले नैसर्गिक संकट दूर करायचे असेल तर वृक्ष लागवड व त्याच बरोबर त्यांच्या संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे . ही महत्वाची बाब इयत्ता पाचव्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकला  सूरज विनोद वाझुळकर याने ओळखली .सुरजने पर्यावरण बचावाचा संदेश देण्याकरीता आगळा वेगळा छंद जोपासला .खेळण्या बागडण्याच्या वयात त्याने ४५० विविध वृक्षांच्या बिया गोळा करून वृक्षांची  बेसुमार कत्तल करणाºयासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे . शाळेत राबविण्यात येत असलेल्या हरितसेनेच्या उपक्रमातुन प्रेरणा घेत सुरजने हा छंद  प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात जोपासला.                        विदर्भातील शहरी व ग्रामीण भाग आणी रानावनात पूर्वी विविध प्रकारचे वृक्ष असायचे,  मात्र गेल्या काही दशकात या वृक्षांची अमाप कत्तल होउन सिमेंट तथा डांबरीकरणाचे रस्ते उदयास आले . मोठमोठी घरे उभारतांना वृक्षांचे मुळातुन अस्तित्व संपविण्यात आले . परिणामी हल्ली अनेक मानवी आरोग्यास हितकारक तथा औषधि उपयोगी वृक्ष-वेली ,झाडे नामशेष झाली आहे . हि महत्वाची बाब लक्षात घेउन एस.एम.सी.इंग्लिश स्कूलने महाराष्ट्र शासनाच्या हरित सेना उपक्रमात सहभाग नोंदविला आहे . शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी हा उपक्रम केवळ कागदोपत्री न राबविता प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला . यातून प्रेरणा घेत हरितसेनेत सहभागी विद्यार्थ्यांना देखील विविध प्रकारच्या वृक्षांशी लळा लागला आहे . त्यातीलच सुरज वाझुळकर या चिमुकल्याने ४५० प्रजातीच्या वृक्ष वनस्पतींच्या बियांचा संग्रह करुन जनसामान्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे .        

बियांचे प्लास्टीक पिशाव्यांमध्ये वेगवेगळे संच      

 सुरजने महत्प्रयासाने गोळा केलेल्या या बियांचे  बियांचे प्लास्टीक पिशाव्यांमध्ये वेगवेगळे संच बनविण्यात आले असुन त्यातील काहि संच वाशीमच्या सामाजिक वनीकरण विभागाला आगामी पावसाळ्यात लागवड करण्यासाठी दिले जाणार आहे व उरलेल्या बियांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या परिसरातील बॉटनिकल गार्डनसाठी वापरला जानार आहे .

टॅग्स :washimवाशिम