शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:08 IST

यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गर्भवती महिला व बालकांना जडणाऱ्या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण मिळवून माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात २ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे. या मोहिमेच्या दुसºया टप्प्यातील कार्यास सोमवार, ६ जानेवारीपासून सुरूवात होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली.क्षयरोग, कावीळ, पोलीओ, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला यासह अन्य आजारांसाठी लसीकरण केल्याने गरोदर माता व बालकांना सुरक्षितता येते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जोखीमग्रस्त भागातील शून्य ते दोन वर्षे वयोगटातील जी बालके आणि गरोदर माता सर्वेक्षणानुसार लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ हे २ डिसेंबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले, की युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने २ डिसेंबर २०१९, ६ जानेवारी २०२०, ३ फेब्रुवारी २०२० आणि २ मार्च २०२० अशा चार टप्प्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोहिम राबविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात, २ डिसेंबरपासून १६२ आरोग्य सेवा सत्राव्दारे जोखीमग्रस्त भागातील सर्वेक्षणानुसार गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात आले. ग्रामीण भागातील १६७ आणि शहरी भागातील ७० अशा एकूण २३७ गरोदर महिला आणि शून्य ते २ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील ९०० आणि शहरी भागातील ५६० अशा एकूण १४६० बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले.

जिल्ह्यात चार टप्प्यात मिशन इंद्रधनुष्य राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २ डिसेंबरपासून राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात ठराविक उद्दीष्टाच्या ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून गरोदर महिला व बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींचे लसीकरण ६ जानेवारीपासून दुसºया टप्प्यात केले जाणार आहे. ग्रामीण भागातील लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम