शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेस स्थगिती नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 12:17 IST

Washim News कोणत्याही प्रकारे स्थगिती देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात १ मार्चपासून शोधमोहीम राबविली जात आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे या शोधमोहिमेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली असता, या मोहिमेस कोणत्याही प्रकारे स्थगिती देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी स्पष्ट केले.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदणी व्हावी, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामांसाठी पाल्यासह कुटुंबे स्थलांतर करीत असल्याने  ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहतात. अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे दि. १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोधमोहीम राबविली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा बंद आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मोहिमेला तूर्तास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्याशी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चाही केली. परंतु, या मोहिमेस स्थगिती मिळणार नसून, काही ठिकाणी अडचण असल्यास १२ मार्चपर्यंत शोधमोहीम राबवा, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.