कारंजा लाड (जि. वाशिम): शहरातील विविध मालमत्ताधारकाकडे असलेला लाखो रुपयांचा कराचा भरणा सूचना देऊनही न भरल्यामुळे नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी शहरातील एस.टी.वाहतूक नियंत्नण कक्षासह अन्य मालमत्ताधारकावर सील करून कारवाई केल्याची घटना २७ मार्चला घडली. जिल्हय़ातील शासकीय कार्यालयांकडे असलेली २ कोटी १७ लाखाची थकबाकी संदर्भात लोकमतने २७ मार्चच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शासकीय कार्यालयाकडे असलेल्या थकीत कर वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. गत दोन वर्षांंपासून कराचा भरणा थकीत असलेल्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा त्वरित करण्याबाब त न.प. कडून सूचना देण्यात आल्या होत्या; मात्न त्या सुचनेचे अद्यापपर्यंत पालन न केल्यामुळे शहरातील एका मंगल कार्यालयासह १७ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यांच्याकडे एकूण १ लाख १५ हजार ८0५ रुपयाचा कर थकीत होता; तसेच एस.टी.वाहतूक नियंत्नण कक्ष व पार्सल ऑफिसला सील केले. यांच्याकडे दोन वर्षांंपासून ६0 हजार ६१0 रूपये कर थकीत होता; तसेच ग्रामीण रुग्णालयात कारवाईकरिता गेले असता, यावेळी वरिष्ठाशी संवाद साधल्यानंतर दोन दिवसात भरणा करणार असल्यामुळे आजची कारवाई थांबली. या कारवाईत मुख्याधिकारीसह कर विभागातील कर्मचार्यांची उ पस्थिती होती.
एस.टी.वाहतूक नियंत्रण कक्षाला सील
By admin | Updated: March 28, 2015 01:56 IST