शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचरामुक्तीसाठी  वाशिम येथील शाळेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:08 IST

वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले.

ठळक मुद्देरस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम येथील सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने रविवारी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी कापड आणि जाड आकाराच्या टाकाऊ कागदांपासून आकर्षक पिशव्या तयार करून त्याची प्रदर्शनी शाळेत भरवित प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला.

वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले, तसेच कापड आणि कागदांपासून तयार केलेल्या पिशव्यांची प्रदर्शनी भरवून प्लास्टिक कचरामुक्तीचा संदेश दिला.

प्लास्टिक चा कचरा दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यावरण दुषित होऊन त्याचे परिणाम मानवी जीवनावर आहेत. पाण्यात पडणाऱ्या  प्लास्टिक  कचऱ्या मुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने प्लास्टिक मुक्ती अभियानही राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या या अभियानाल हातभार लावून प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम येथील सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने रविवारी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले. शिवाय इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी कापड आणि जाड आकाराच्या टाकाऊ कागदांपासून आकर्षक पिशव्या तयार करून त्याची प्रदर्शनी शाळेत भरवित प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला. मुख्याध्यापिका भाकरे यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या या उपक्रमात साबळे, कढणे या शिक्षिकांनी प्लास्टिकमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भागवतराव देशमुख आणि स्मिता कदम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी ज्योती भाकरे, अशोक ढोके, हिप्पी भिरोड, अनिल गोरे, दूर्गा कढणे, राधा साबळे, जया आरू, राधेशाम गवळी, रघुनाथ करवते, निलेश मोरे, सागर जाधव, चित्रा धनगांवकर या शिक्षकवृंदांसह शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर, शोभा पाचरे, रुपाली काटकर आदिंचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा