वाशिम: जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पध्रेत स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर ३0 जुलै पासून प्रारंभ झाला आहे. दरम्यान ३१ जुलै रोजी १७ वर्षा खालील मुलांच्या सामन्यांमध्ये लॉयन्स विद्या वाशिम, एन.एन.मुंदडा हायस्कुल मालेगाव, शिवाजी हायस्कुल वाशिम यांनी चमकदार कामगिरी करुन उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. दरम्यान सकाळी झालेल्या एन.एन.मुंदडा आणि माऊंट कारमेल हायस्कुलमध्ये झालेला अत्यंत चुरशीचा सामना पॅनल्टी शुटआऊटच्या जोरावर एन.एन.मुंदडा हायस्कुल मालेगावने शिखात घातला. ३0 जुलै रोजी १४ वर्षा खालील मुला मुलींच्या गटात क्रीडा संकुलावर सामने झाले. यामध्ये माऊंट कारमेल हायस्कुलने शांती निकेतन विद्यालयाचा 0-२ अशा गोल फरकाने विजय मिळवित विभागीय पातळीवर जाण्याचा मान मिळविला आहे. दरम्यान १४ वर्ष वयोगटात मुलींची एकमेव चमु सहभागी झाल्याने या चमुस पुढे चाल देण्यात आली आहे.
शालेय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ
By admin | Updated: July 31, 2015 23:57 IST