शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील अनियंत्रित वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 14:29 IST

वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते,.

ठळक मुद्दे शाळांच्या बाहेर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुसाट वेगाने वाहने धावत असतात. शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार रस्त्याच्या कडेने कसेबसे शाळेत दाखल होतात.

वाशिम: शहरातील बहुतांश माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्य रस्त्यांच्या कडेला वसलेल्या आहेत. त्यामुळे शाळा भरताना आणि सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील लहान-सहान वाहनांसह जडवाहनांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतरच घरच्या रस्त्याला लागता येते, अशी बिकट स्थिती उद्भवली आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे चिक्कार गर्दीतून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी वाहतूक विभागही अद्याप पुढे आलेला नाही. त्यामुळे शाळेतील कर्मचाºयांनाच ही भूमिका पार पाडावी लागत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम शहरातील श्री शिवाजी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एसएमसी इंग्लिश स्कुल, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय रस्त्याच्या कडेला वसलेले असून या शाळांच्या बाहेर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुसाट वेगाने वाहने धावत असतात. दरम्यान, शाळा सुरू होताना विद्यार्थी आपापल्या सोयीनुसार रस्त्याच्या कडेने कसेबसे शाळेत दाखल होतात; परंतु शाळा सुटल्यानंतर एकाचवेळी कुणी सायकलने; तर कुणी पायदळ शाळेच्या बाहेर पडतो. अशावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी धावणाºया वाहनांना किमान काहीवेळ जागीच थांबविल्यास विद्यार्थी सुरक्षितरित्या रस्ता ओलांडून घरच्या रस्त्याला लागू शकतात. मात्र, ही व्यवस्था अद्याप शहरात उभी झालेली नाही. शहर वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे आवश्यक असून नगर पालिका आणि जिल्हा प्रशासनानेही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे. वाशिममधील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळांनी त्यांना जाणवणाºया अडचणीसंदर्भात वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार करायला हवा. शाळा सुरू होताना आणि सुटताना संबंधित शाळांसमोर निश्चितपणे वाहतूक कर्मचाºयांच्या ‘ड्युटी’ लावण्यात येतील.- ज्योती विल्हेकर,शहर वाहतूक निरीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिम