शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 15:11 IST

वाशिम : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृतीचे अनेक अर्ज प्रलंबित असून, सदर अर्ज निकाली काढण्यासाठी आता ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृतीचे अनेक अर्ज प्रलंबित असून, सदर अर्ज निकाली काढण्यासाठी आता ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली.राज्य शासनामार्फत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल १ आॅक्टोंबर २०१८ पासून नव्याने सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक यांनी तयार केलेल्या संकेतस्थळावरून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. महाडीबीटी पोर्टलवर २१ मार्च २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि महाविद्यालयांना अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. आता ही मुदत ३० जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.वाढीव मुदतीत शासनाच्या संकेतस्थळावरील विजाभज, इमाव, विमाप्र तसेच अनुसूचित जाती प्रवगार्तील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालय स्तरावरील आॅनलाईन झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित पात्र अर्ज तत्काळ विनाविलंब निकाली काढता येतील. ही अंतिम मुदतवाढ असून ३० जून २०१९ नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, असा इशारा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी दिला. महाबीडी पोर्टलवरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ३० जून ही अंतीम मुदतवाढ आहे. यानंतर मुदवाढ नसल्याने अर्ज निकाली काढावेत. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापकांवर राहील.- माया केदारसहाय्यक आयुक्त, समाजकल्याणवाशिम

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती