दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्गावर प्रतिबंधासाठी दिल्या जाणाऱ्या लसीबाबत विविध गैरसमज असून, लस घेतल्यानंतर ताप न आल्याने कोरोना प्रतिबंधक लस आपणासाठी परिणामकारक ठरली नसल्याची शंका, अनेक जण उपस्थित करीत आहेत, तर काहींना ही लस खरी नसल्याचेही वाटत आहे.
कोरोनापासून बचावासाठी लस टोचून घेणे हा सर्वाेत्तम पर्याय आहे. पण, लसीकरणानंतर काहींना प्रचंड अंगदुखी, थंडी - ताप, डोकेदुखी असा त्रास होतो, तर काहींना फारसा त्रासदेखील जाणवत नसल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात लसीच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी शरीरात अँटिबॉडीज निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीरात सुरू असणाऱ्या लढ्याचे दृष्य स्वरूप थंडी-ताप, अंगदुखी, दंड दुखणे, अशा लक्षणांच्या स्वरूपात दिसते. त्याचवेळी लस परिणामकारक ठरल्याचा विश्वास लोकांत रुजला असल्याने लस घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवत नसल्याने आपल्यासाठी लस परिणामकारक ठरली नसल्याचे त्यांना वाटत आहे.
०००००००००००००००००००००००००००
कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्डला पसंती
कोरोना प्रतिबंधासाठीच्या लसीकरणात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड तसेच भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा वापर केला जात आहे. दोन्ही लसींची परिणामकारकताही सिद्ध झाली आहे, परंतु कोव्हॅक्सिन घेतलेल्या अनेकांना कोविशिल्डच्या तुलनेत कमी त्रास होत असल्याचा समजही पसरला आहे. त्यामुळे कोविशिल्डची लस प्रभावी असल्याचे अनेकांचे मत बनले आहे.
०००००००००००००००००००तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना कमी त्रास
लस घेतल्यानंतर विषाणू विरोधात लढा सुरू होऊन शरीरात दाह होतो. तरुणांची प्रतिकारशक्ती जास्त असते, तर ज्येष्ठांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती तुलनेत कमी असते. त्यामुळे तरुणांना लसीकरणानंतर जास्त त्रास होताे, तर वयस्कर नागरिकांना कमी त्रास होतो. परंतु त्याचा अर्थ ज्येष्ठांसाठी लस परिणामकारक ठरली नाही, असा होत नाही.
००००००००००००००००त्रास होणे म्हणजेच लस प्रभावी असणे नाही.
कोट: वेगवेगळ्या आजाराला प्रत्येकाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असते. शरीराच्या रोगप्रतिकारकारक शक्तीवर हा प्रतिसाद अवलंबून असतो. लसीच्या बाबतीतही असेच आहे. लस घेतल्यानंतर एखाद्याला अधिक किंवा कमी त्रास होतो. मात्र, त्रास न झाल्यास आपल्या शरीरासाठी लस परिणामकारक ठरलेली नाही, असे समजण्याचे कारण नाही.
-डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक,
००००००००००००
लसीचा काहीच परिणाम दिसला नाही१) कोट: आरोग्य विभागाच्या केंद्रावर जाऊन मी कोरोेनाची लस घेतली. माझ्यासोबत लस घेणाऱ्या अनेकांना थोडा ताप आला. परंतु मला काहीच त्रास जाणवला नाही. त्यामुळे लस आपल्यासाठी परिणामकारक ठरली नाही, असे वाटत आहे
- शालिनी हिरामन ठोक, (04wh07)००००००००००००००
२) कोट: मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर कोणताच त्रास जाणवला नाही किंवा तापही आला नाही. त्यामुळे कोरोनाची लस आपल्यासाठी प्रभावी ठरल्याचे वाटले नाही. माझ्यासोबत लस घेणाऱ्या इतरांना मात्र दिवसभर ताप आला. अंगही दुखत होते.- उमाकांत बोरकर, (04wh08)
३) मी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले. एकाही डोसनंतर ताप आला नाही किंवा अंगही दुखले नाही. त्यामुळे लसीबाबत शंका निर्माण झाली. डाॅक्टरांनी मात्र प्रत्येकाला लसीचा त्रास होतोच असे आवश्यक नसल्याचे सांगितले.- विलासराव गायकवाड,
--------लसीकरणाची स्थिती
उद्दिष्ट - १०,१३,१८०पहिला डोस - ४,११,१९०,
दुसरा डोस, १,६६,५२७