शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:11 IST

वाशिम : मराठा सेवा संघाच्या वतीने बुधवार, ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून याअंतर्गत १२ जानेवारीपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देसावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाच्या नावाने मराठा सेवा संघ व विविध कक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्यात गाव तेथे शाखा उद्घटन या अभियानास प्रारंभ.अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता व संत तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर या विषयावर उद्बोधन होणार आहे.

वाशिम : मराठा सेवा संघाच्या वतीने बुधवार, ३ जानेवारीपासून सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून याअंतर्गत १२ जानेवारीपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे कार्यक्रम याच महोत्सवापासून सुरू होत असून वाशिम व अकोला जिल्ह्यात ३ जानेवारी ते १२ जानेवारी हा कालावधी सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाच्या नावाने मराठा सेवा संघ व विविध कक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्यात गाव तेथे शाखा उद्घटन या अभियानास प्रारंभ झाला असून विविध ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्ष संजीवनी बाजड यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी काम करतील. ६ जानेवारीला मराठा सेवा संघाच्या वतीने विविध शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जानेवारीला पिंपळगाव डाक बंगला येथे डॉ. डिगांबर निरगुडे हे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करतील. ८ जानेवारी रोजी शाळा परिसर सफाई, ग्रामसफाई तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम उमरा शमशोद्दीन येथे संजय पडोळे, उत्तमराव आहेर व योगेश खोडके राबवतील. ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील, सचिव हभप निवृत्ती महाराज भालेराव, कार्याध्यक्ष हभप वामन महाराज महाले  यांच्यावतीने जांभरुण महाली येथे उपक्रम राबवण्यात येणार असून यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता व संत तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर या विषयावर उद्बोधन होणार आहे, असे मराठा सेवा संघाने कळविले.

टॅग्स :washimवाशिम