शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

वाशिम येथे ३  ते १२ जानेवारी दरम्यान सावित्री, जिजाऊ दशरात्रौत्सव; मराठा सेवा संघाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:45 IST

वाशिम : मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासून ते १२ जानेवारी या राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनापर्यंतचा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्दे१० दिवस विविध सामाजिक उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासून ते १२ जानेवारी या राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनापर्यंतचा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी सोमवारी दिली. रविवारी मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे कार्यक्रम याच महोत्सवापासून सुरू होत असून वाशिम व अकोला जिल्ह्यात ३ जानेवारी ते १२ जानेवारी हा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवाच्या नावाने मराठा सेवा संघ व विविध कक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्यात गाव तेथे शाखा उद्धाटन या अभियानाला प्रारंभ होत असून विविध ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बाजड यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी काम करतील. ६ जानेवारीला मराठा सेवा संघाचे वतीने विविध शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पधेर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुख्य कार्यक्रम काजळांबा येथे होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सोनटक्के यांनी केले आहे. ७ जानेवारीला पिंपळगाव डाक बंगला येथे डॉ. डिगांबर निरगुडे हे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करतील. ८ जानेवारी रोजी शाळा परिसर सफाई, ग्रामसफाई तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम उमरा शमशोद्दीन येथे संजय पडोळे, उत्तमराव आहेर व योगेश खोडके राबवतील. ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील, सचिव हभप निवृत्ती महाराज भालेराव, कार्याध्यक्ष हभप वामन महाराज महाले  यांच्या वतीने जांभरुण महाली येथे उपक्रम राबवण्यात येणार असून यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता व संत तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर या विषयावर उद्बोधन होणार आहे. या कार्यक्रमात सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिम