शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सत्यसाई समितीकडून मालेगाववासियांना मोफत पाणी पुरवठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:35 IST

मालेगाव: शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, श्री सत्यसाई  सेवा समिती मालेगावच्यावतीने नागरिकांना १२ हजार लीटर क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे.

ठळक मुद्देसध्या मालेगाव शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.नियोजन चुकल्याने शहरवासियांची तहान भागविण्याचा मोठा बिकट प्रश्न नगर पंचायतपुढे उभा झाला होता.सत्य साई सेवा समितीने यापूर्वी तालुक्यातील वाकळवाडी येथेही सतत दोन महिने ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा केला.

मालेगाव: शहरात उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता, श्री सत्यसाई  सेवा समिती मालेगावच्यावतीने नागरिकांना १२ हजार लीटर क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. 

सध्या मालेगाव शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे कुरळा धरण आटल्यानंतर नगर पंचायतने प्रभाग निहाय तीन टँकर सुरु केले. त्याशिवाय मध्यंतरी काटेपूर्णा ते कुरळा या तात्पुरत्या योजनेसाठी १.३५ कोटी रुपये खर्चून जलवाहिनीही टाकली; परंतु ते नियोजन चुकल्याने शहरवासियांची तहान भागविण्याचा मोठा बिकट प्रश्न नगर पंचायतपुढे उभा झाला होता. जलवाहिनी जीर्ण झाल्याने ही योजना फसल्यानंतर नगर पंचायतकडून शहरात टँकरने पाणी पुरविणे सुरू केले; परंतु नागरिकांची तहान भागविणे त्यानेही शक्य झाले नाही. नागरिकांची तहान भागविण्यासाठी शहरातील समाजसेवक, तसेच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असताना आता सत्यसाई सेवा समिती मालेगावच्यावतीने १२ हजार लीटर क्षमतेचे टँंकर सुरु करुन गरीब जनतेची तहान भागविण्याचा स्तुत्य उपक्रम चालु केला आहे. याचा अनेक लोकांना लाभ होत आहे. सत्य साई सेवा समितीने यापूर्वी तालुक्यातील वाकळवाडी येथेही सतत दोन महिने ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा केला. सद्यस्थितीत त्यांच्यावतीने मालेगाव शहरात प्रभाग निहाय दोन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी महेन्द्र ऊंबरकर, डॉ राजाभाऊ घुगे, सोपान बुढाळकर, राजेश पवार, विनोद कल्याणकर हे परीश्रम घेत आहेत. 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवWaterपाणी