शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अन् त्याने चक्क घराच्या छतावर बसून भरला शेतकऱ्यांचा पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 11:18 IST

गजानन देशमुख असे या आपले सरकार सेवा केंद्रचालकाचे नाव असून, तो वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवासी आहे.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, या धडपडीत असताना नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा आल्याने एका आपले सरकार सेवा केंद्र चालकाने थेट घराच्या टिनपत्र्यावर संगणक आणि इतर साहित्य ठेवून शेतकºयांकडून पीक विमा भरून घेतला. गजानन देशमुख असे या आपले सरकार सेवा केंद्रचालकाचे नाव असून, तो वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवासी आहे.यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेंतर्गत १ जुलैपासून शेतकºयांकडून पीक विमा हफ्त्याचा भरणा करून घेतला जात आहे. सुरुवातीला त्यात अनेक अडचणी आल्या. काही बँकांनी नकार दिला, तर काही गावांतील सातबारा पोर्टलवर अपलोड होणे अवघड झाले होते. त्यामुळे या योजनेत शेतकºयांचा सहभाग कमी होण्याची भीती होती. आता या अडचणी दूर झाल्यानंतर शेतकºयांनी पीक विमा भरण्यासाठी घाई केली. त्यात ३१ जुलै ही अंतीम मुदत असताना नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली. असाच प्रकार रिसोड तालुक्यातील येवता येथील आपले सरकार सेवा केंद्रावर पाहायला मिळाला. तथापि, शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नयेत म्हणून या सेवा के द्राचे संचालक गजानन देशमुख यांनी थेट घराच्या छताच्या टिनपत्र्यावर संगणक (लॅपटॉप) आणि इतर साहित्य घेऊन जात दिवसभर शेतकºयांचा पीक विमा भरून दिला. त्यामुळे येवतासह परिसरातील अनेक शेतकºयांना या योजनेत सहभागी होणे शक्य झाले आहे.पीकविमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलै ही अंतीम मुदत होती. त्यात येवता येथे नेट कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक गजानन देशमुख यांनी छतावर संगणक घेऊन जात शेतकºयांना पीक विमा भरून दिल्याची माहिती आमच्या सहकाºयांकडून प्राप्त झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शेतकºयांना योजनेत सहभागी होता आले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा