शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संत सेवालाल महाराज जन्मोत्सव : पोहरादेवीत शेकडो भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 19:07 IST

Sant Sewalal Maharaj Janmotsav: भाविकांनी संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.

मानोरा : बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. विविध ठिकाणांवरून आलेल्या शेकडो भाविकांनी संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत महाप्रसादाचा लाभ घेतला.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ८ फेब्रुवारीपासून जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. १५ फेब्रुवारीला जन्मोत्सव सोहळा निमित्त गावातून पहाटेच्या सुमारास पालखी सोहळा काढून नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली. ठिकठिकाणी चहा, नाश्ता, पाणी तर वसंतनगर येथील काही भाविकातर्फे ाप्रसाद वाटप करण्यात आले. पालखी सोहळा सात तास चालला असून, त्यानंतर पालखी मंदिरात पोहोचली. यावेळी राजुदास महाराज यांनी पाळणा गीत सादर केले. संस्थानचे अध्यक्ष महंत कबिरदास महाराज यांनी बापूची आरती म्हटल्यावर भोग (भंडारा) अर्पण करून आरदास करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे विलास राठोड, प्रकाश राठोड, प्रा. जगदीश राठोड, कुंडलिक राठोड, उल्हास महाराज, खुशाल महाराज यांच्यासह मान्यवरांनी परिश्रम घेतले. राष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज आश्रमात जन्मोत्सवराष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज आश्रमात जगतगुरू संत सेवालाल महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बापूचे उत्तराधिकारी महंत बाबूसिंग महाराज यांनी पूजा विधी भोगभंडारा अर्पण करून आरदास म्हटले. यावेळी आश्रमतर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी महंत संजय महाराज, बलदेव महाराज, इंजि. रमेश पवार, भोला राठोड, शेषराव जाधव, जे .जे. राठोड, टी. आर. राठोड ,राहुल महाराज, गदर महाराज, धीरज महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. भक्तीधाम येथे विविध कार्यक्रम करण्यात आले. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग लावण्यात आला. महंत जितेंद्र महाराज यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. दिग्रस व मानोरा आॅटो प्रवास मोफतदिग्रस व मानोरा येथुन श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे येणाºया भाविकांसाठी गावातील ४५ आॅटोधारकांनी एक दिवस कोणतेही प्रवासी भाडे न आकारता मोफत सेवा दिली. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराIndian Festivalsभारतीय सण