शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात संत सावता माळीचा जयघोष; भाविकांना महाप्रसादाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:35 IST

शिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला.

ठळक मुद्देशिरपूर जैन येथे संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या शोभायात्रेत विविध वेषभुषा धारण केलेले युवक लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. या शोभायात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. या शोभायात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरपूर जैन येथे संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संत सावतामाळी मंदिरावर सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पुण्यतिथी सोहळ्याच्या मुख्य दिवशी १० आॅगस्ट रोजी परिसरातील भजनी मंडळे व हजारो भाविकांच्या सहभागाने संत सावता माळी यांच्या पालखीची शोभायात्रा गावातून फिरविण्यात आली. या शोभायात्रेत विविध वेषभुषा धारण केलेले युवक लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. संपूर्ण गावात ही शोभायात्रा फिरविल्यानंतर दुपारी ३ वाजता संत सावता माळी संस्थानच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. या महाप्रसादासाठी ११ क्विंटल गव्हाच्या पोळ्या, १० क्विंटल काशीफळाची भाजी, १.५० क्विंटल रव्याचा शिरा आणि २ क्विंटल भात बनविण्यात आला होता. श्वेतांबर जैन संस्थानकडून भाविकांना अल्पोपहारसंत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. या भाविकांची सेवा म्हणून श्वेतांबर जैन संस्थानच्यावतीने ठिकठिकाणी चहापान आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. शेकडो स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना अल्पोपहार व चहापान पुरवित होते. माळी बांधवांची दुचाकी रॅलीसंत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पालखी शोभायात्रा काढण्यापूर्वी माळी समाजबांधवांनी गावातून दुचाकी रॅली काढली. यात शेकडो माळी समाज बांधव सहभागी झाले होते. या दुचाकी रॅलीत हाती झेंडे घेऊन सहभागी झालेले युवक संत सावता माळी यांच्या नावाचा जयघोष करीत होते.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनReligious programmeधार्मिक कार्यक्रम