लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेंतर्गंत रविवार २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करुन ‘सेवा दिवस’ शहरवासियांच्यावतिने साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या पुढाकाराने घेतलेल्या या कार्यक्रमास शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्व्च्छता सेवा उपक्रमात सर्वच स्तरातील् जनता सहभागी होवून प्रशासन व पदाधिकाºयांच्यावतिने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मुख्य रस्त्यासह बसस्थानक, पोलीस स्टेशन परिसरासह शहरातील मुख्य मार्गावरील संपूर्ण रस्त्याच्या स्वच्छतेसह रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपेही यावेळी काढण्यात आलेत. या श्रमदानात शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्थानकातील व्यापक व मोठ्या प्रमाणात स्वच्छता केली. या सर्व स्वच्छता मोहिमेमध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी स्वताहा हातात झाडू घेवून शहराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. यावेळी नगरउपाध्यक्ष रुपेश वाघमारे, दिलीप जोशी, मारवाडी युवा मंचचे मनिष मंत्री यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, सेठी, मुन्ना खान, काष्टे, उल्हेमाले, भालेराव, भिमजिवनाणी, अभियंता राजेश घुगरे, उज्वल देशमुख, संतोष किरळकर, नागापुरे, जितु बढेल, नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेच अध्यक्ष, नगरपरिषद सभापती व सर्व सदस्य तसेच शहरातील नागरीक, शाळा, वकील मंडळी, डॉक्टर मंडळी,र् प्राध्यापक, हेड मास्तर, न. प. कर्मचारी यांचा सहभाग होता.
शहरवासियांनी पाळला ‘स्वच्छता सेवा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:23 IST
वाशिम : वाशिम शहरामध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेंतर्गंत रविवार २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करुन ‘सेवा दिवस’ शहरवासियांच्यावतिने साजरा करण्यात आला. नगरपरिषदेच्या पुढाकाराने घेतलेल्या या कार्यक्रमास शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरवासियांनी पाळला ‘स्वच्छता सेवा दिवस’
ठळक मुद्देश्रमदान करुन साजरा करण्यात आलानगरपरिषदेचा पुढाकार