शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:52 IST

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली.

वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली. उर्वरीत ग्रामपंचायतींची जबाबदारी वर्ग एक ते तीन दर्जाच्या अधिकारी, कर्मचाºयांवर सोपविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना समन्वयातून वर्ग एक ते तीन दर्जाच्या अधिकाºयांवर एक, एक गाव नेमून देण्याची जबाबदारी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभगााने सोपविली आहे. सदर कर्मचाºयांना १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावात ठरवून दिलेले सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत व त्या उपक्रमांचे संनियंत्रण होण्याकरीता वर्ग एक ते तीनच्या अधिकारी, कर्मचाºयांना ग्रामपंचायत नेमून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून ७० ग्रामपंचायत स्तरावर ७० नोडल अधिकारी नेमून दिले आहेत. उर्वरीत ग्राम पंचायतींमध्ये नोडल अधिकारी म्हणून अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकाºयांना  दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद