शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या भुसंपादनाला ८० टक्क्यांवर लागला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:59 IST

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे.भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता.सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाशिम : एकत्रीकरणाचे वाद, वहिवाटीचे मुद्दे, न्यायालयीन प्रकरणे, भूदान यासह इतर स्वरूपातील वादात अडकून असलेल्या जमिनींच्या संपादनाचा मार्ग प्रशस्त होणे अशक्य झाल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस ८० टक्क्यांवर ‘ब्रेक’ लागला आहे. यामुळे हे गहण प्रश्न कधी सुटतील आणि महामार्गाचे प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होईल, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांमधून ९७ किलोमिटरचे अंतर कापत पुढे जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनींचे संपादन केले जात आहे. सुरूवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेस सरळ खरेदी पद्धतीचा अवलंब केल्यानंतर मध्यंतरी चांगला वेग प्राप्त झाला होता. त्यामुळेच एप्रिलच्या सुरूवातीला जिल्ह्यात ८० टक्के जमिनींचे संपादन यशस्वी झाले. सद्या मात्र ही प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली असून जोपर्यंत जमिनींवरील वाद निकाली निघत नाहीत, तोपर्यंत भूसंपादन अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे समृद्धी महामार्गाचे काम नेमके कधी सुरू होणार, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :washimवाशिमSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग