शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात संत सावतामाळीचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 17:01 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने आयोजित संत सावता माळी पुण्यतिथीचा समारोप बुधवार ३१ जुलै रोजी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने आयोजित संत सावता माळी पुण्यतिथीचा समारोप बुधवार ३१ जुलै रोजी करण्यात आला. यानिमित्त गावातून संत सावता माळी यांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संत सावता माळी यांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता. शोभायात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.शिरपूर जैन येथील संत सावता माळी संस्थानच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संस्थानमध्ये आठवडाभर श्रीमद् भागवत कथा वाचनासह किर्तन, प्रवचन, प्रबोधन असे विविध कार्यक्रम पार पडले. ३१ जुलै हा संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीचा दिवस होता. तयामुळे गावामध्ये संत सावतामाळी यांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात  आली. या पालखी शोभायात्रेमध्ये हजारो माळी समाज बांधव सहभागी झाले होते. ठिक ठिकाणी संत सावता माळी यांच्या पालखीचे स्वागत व पुजन भाविकांच्यावतीने करण्यात आले. पालखीमध्ये बालगोपालांनी लेझिमचे प्रात्यक्षिक दाखविले, तर वयोवृद्ध भाविकांनी भजने सादर केली.पालखीतील भाविकांसाठी महात्मा फुले वेटाळ, ईरतरकर वेटाळासह सेवानिवृत्त शिक्षक तुळशीराम जाधव यांच्याकडून चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीनंतर संत जानगीर महाराज संस्थान मध्ये महाप्रसाद वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी २५ क्विंटलच्या पोळ्या, ११ क्विंटल काशी फळाची भाजी व २ क्विंटल रव्याचा शिरा तयार करण्यात आला होता. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. युवकांनी काढली दुचाकी रॅली  संत सावता माळी यांच्या पुण्यतथीनिमित्त शिरपूर येथे युवकांनी दुचाकी रॅलीही काढण्यात आली होती. सकाळी ९ वाजता माळी युवा संघाच्यावतीने गावातून ही दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत ही मोठ्या प्रमाणात माळी युवकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी माळी समाजातील युवकांनी परिश्रम घेतले. संत सावता माळी यांचा जयघोष करीत ही रॅली शिस्तबद्ध पद्धतीने गावातील मुख्य रस्त्यावरून फिरविण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन