शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : शिरपुरात देशभरातील साधू-साध्वींची मांदियाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:12 IST

शिरपूर जैन: येथील श्री अंतरिक्ष पार्श्‍वनाथ श्‍वेतांबर संस्थानमध्ये डॉ. इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांच्या जीवित महोत्सवानिमित्त ३ व ४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक अनुष्ठान व सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात देशभरातील जैन मुनींसह ६४ साधू-साध्वींनी सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देसिद्धचक्र पूजनाचा कार्यक्रम मातृपितृ सिद्धचक्र वंदना संध्याभक्ती कार्यक्रमास प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: येथील श्री अंतरिक्ष पार्श्‍वनाथ श्‍वेतांबर संस्थानमध्ये डॉ. इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांच्या जीवित महोत्सवानिमित्त ३ व ४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक अनुष्ठान व सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात देशभरातील जैन मुनींसह ६४ साधू-साध्वींनी सहभाग नोंदविला.आचार्य जगच्चंद्रसुरिश्‍वरजी महाराज, अंतरिक्ष तीर्थ विकास प्रेरक  पंन्यास प्रवर विमलंहस विजयजी महाराज, पंन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्यासह इतर ६४ जैन मुनी व ५00 जैन श्‍वेतांबर भक्तांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. गत २५ वर्षात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा संख्येने शिरपूर जैनमध्ये जैन मुनींचे आगमन झाले होते. या महोत्सवात अकोला येथील विधीकार हर्षदभाई शाह यांच्या सानिध्यात सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजन करण्यात आले. मुंबई येथील प्रसिद्ध जैन संगीतकार प्रतीक गेमावत यांनी मातृपितृ सिद्धचक्र वंदना हा संध्याभक्ती कार्यक्रम प्रस्तुत केला. सागर केंदुलकर यांनी १८ पापस्थानक नवृत्ती हेतू आलोचनाचे पूजन केले. या महोत्सवानिमित्त इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांची लाडूतुला करण्यात आली. छल्लानी परिवारातर्फे यानिमित्त पारसबाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे दिनेश मुथा,  बाबुराव बोराटे, अशोक भन्साली, जयदीप  कोठारी, राहुल जैन, राजेशभाई  शाह, मनीष बारमेचा आदींनी पुढाकार घेतला. 

जगच्चंद्रसुरिश्‍वरजी महाराजांचे आज वाशिममध्ये आगमनजैन समाजातील जैन मुनी आचार्य जगच्चंद्रसुरिश्‍वरजी महाराज यांच्यासह ६४ जैनमुनींचे ५ फेब्रुवारीला वाशिम शहरात आगमन होत आहे. येथे आयोजित प्रवचनाच्या कार्यक्रमानंतर त्यांचे हिंगोलीकडे प्रस्थान होणार असल्याचे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र