शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही गुंजतो वाघ्या-मुरळीचा आवाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:15 IST

गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत; मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या असून जागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.मुळचे गुंज (ता.वसमत, जि.परभणी) येथील तथा गेल्या काही वर्षांपासून वाशिम शहरातील नंदीपेठमध्ये वास्तव्यास असलेले किसन विश्राम गुंजकर हे गावोगावी जावून जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमांमधून समाजप्रबोधनाचे काम करित आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडिल शाहीर विश्राम रानोजी गुंजकर यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालूसरे, पुरंदरचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडचा रणसंग्राम, गड आला पण सिंह गेला, संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास, शंभू शौर्य आदी विषयांवरील पोवाडेही किसन गुंजकर पहाडी आवाजात सादर करतात. याशिवाय गोंधळ आणि जागरणाचे कार्यक्रमही केले जात असल्याचे ते म्हणाले.खंडोबाचे उपासक आहेत वाघ्या-मुरळी!वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येवूनही जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करायचे आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या; तर मुलगी असल्यास तीने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे, असा वाघ्या-मुरळीचा इतिहास असल्याची माहिती गुंजकर यांनी दिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण ११ ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर वाघ्या-मुरळींकडून जागरण घातले जाते, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक