शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : मोफत प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:46 IST

२१ सप्टेंबरपर्यंत या बालकांना प्रवेश संबंधित शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई अंतर्गंत (शिक्षण हक्क अधिनियम) चवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली होती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ८८ विद्यार्थ्यांचा समावेश असून, २१ सप्टेंबरपर्यंत या बालकांना प्रवेश संबंधित शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाऱ्या बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागात अंतिम मुदतीपर्यंत हजारो आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. तीन लॉटरी पद्धतीतून २५ टक्के कोट्यातील जागा भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. विहित मुदतीत अनेक बालकांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या. या रिक्त जागांवर आॅनलाईन अर्ज सादर करणाºया बालकांना प्रवेश देण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी चवथी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील ८८ याप्रमाणे यवतमाळ १७८, अकोला १२१, अमरावती २४३ आणि बुलडाणा २०८ अशा एकूण ८३८ बालकांची निवड झाली. २१ सप्टेंबरपर्यंत या बालकांना संबंधित शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. अजून काही बालकांनी शाळेशी संपर्क साधला नसल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संबंधित पालकांनी संबंधित शाळेशी संपर्क साधावा, कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

कागदपत्रे सादर न केल्यास प्रवेश मिळणार नाहीनिवड झालेल्या बालकांच्या पालकांना संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीसमोर आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा तसेच संबंधित पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क न साधल्यास बालकांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. वाशिम जिल्ह्यातील ८८ बालकांची निवड झाली. या बालकांनी प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा किंवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा