शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : मोफत प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 12:09 IST

Right To Education २३ ऑक्टोंबरपर्यंत शाळा स्तरावरच बालकांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रतिक्षा यादीतील बालकांना संबंधित शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी आता २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ही मुदत ८ ऑक्टोबर अशी होती. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. पहिल्या लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना ८ ऑक्टोबरपर्यंत मोफत प्रवेशाची संधी दिली होती. या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील ९७६ पैकी ६०७ बालकांनी प्रवेश घेतले. उर्वरीत ३६९ बालकांचे प्रवेश झाले नसल्याने त्यांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागले. या बालकांना आणखी एक संधी मिळावी, अशी मागणी विविध स्तरातून झाली. याची दखल घेत पुन्हा मुदतवाढ मिळाली असून, २३ ऑक्टोंबरपर्यंत शाळा स्तरावरच बालकांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा