शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : मोफत प्रवेश घेण्याला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:02 IST

वाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाली असून, या बालकांना आता २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिसºया लॉटरीत २७० बालकांची निवड झाली असून, या बालकांना आता २४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. यापूर्वी ही मुदत १८ जुलैपर्यंत होती. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील ९३ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण ९६५ जागांसाठी अंतिम मुदतीपर्यंत १८८२ प्रवेश अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीत ५४३ आणि दुसºया लॉटरी पद्धतीतून ३८८ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली होती. रिक्त जागांवर प्रवेश व्हावे यासाठी १० जुलै रोजी तिसरी लॉटरी सोडत काढली असून, यामध्ये २७० बालकांची निवड झाली. निवडपात्र २७० बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, यापूर्वी १८ जुलैपर्यंत अंतिम मुदत होती. विहित मुदतीत अनेक पात्र बालकांना मोफत प्रवेश घेता आला नाही. जिल्ह्यात २७० बालकांची निवड झालेली असतानाही, १२५ बालकांचा प्रवेश झाला आहे. मोफत प्रवेशापासून पात्र बालक वंचित राहू नये म्हणून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली होती. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने आता २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, या मुदतीत तिसºया लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या बालकांना प्रवेश घ्यावा लागणार आहे. २७० पैकी १२५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून अजून १४५ बालकांचे प्रवेश उर्वरीत आहेत. या बालकांच्या पालकांनी २४ जुलैपर्यंत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा