शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई : पालकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘मेस्टा’ संघटनेचा बहिष्कार मागे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:52 IST

गोरगरिब पालकांची यामुळे गैरसोय होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शुक्रवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘आरटीई अ‍ॅक्ट’अंतर्गत जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांना गेल्या पाच वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने मोफत प्रवेश प्रक्रियेवर ‘मेस्टा’ संघटनेने बहिष्कार टाकला होता. मात्र, गोरगरिब पालकांची यामुळे गैरसोय होऊ लागल्याने ती टाळण्यासाठी बहिष्कार मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शुक्रवारी दिली. यामुळे रखडलेल्या मोफत प्रवेश प्रक्रियेस वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थाचालकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करित विद्यार्थ्यांना दरवर्षी २५ टक्के राखीव कोट्यातून शाळांमध्ये मोफत प्रवेश दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून त्यापोटी देय असलेल्या शिक्षणशुल्काची प्रतिपुर्ती जिल्हा परिषदेकडून झाली नाही. यामुळे ‘मेस्टा’ या खासगी इंग्रजी शाळांच्या संघटनेने यंदा २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. परिणामी, पहिल्या लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या ५४३ बालकांपैकी २ मे पर्यंत केवळ २९१ बालकांचेच प्रवेश होऊ शकले. यामुळे गोरगरिब पालक अक्षरश: हैराण झाले होते. यासह शाळांमधील कार्यरत विशेषत: महिला मुख्याध्यापकांना पालकांच्या रोषाचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेवून ‘मेस्टा’ संघटनेने मोफत प्रवेश प्रक्रियेवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला. यामुळे पालकांची गैरसोय टळून मोफत प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत शासन आणि न्यायालयाकडे मात्र दाद मागितली जाईल, असे ‘मेस्टा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष गडेकर यांच्यासह विदर्भ अध्यक्ष अभिजित देशमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदाEducation Sectorशिक्षण क्षेत्र