शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई : चवथ्या लॉटरीतून ८३८ बालकांची निवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:10 IST

चवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई अंतर्गंत (शिक्षण हक्क अधिनियम) चवथ्या लॉटरी पद्धतीतून ९ सप्टेंबर रोजी अमरावती विभागातील ८३८ बालकांची निवड झाली असून, २१ सप्टेंबरपर्यंत या बालकांचे प्रवेश संबंधित शाळांमध्ये घ्यावे लागणार आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्ग, दिव्यांग व वंचित घटकांतर्गत येणाºया बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागात अंतिम मुदतीपर्यंत हजारो आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. तीन लॉटरी पद्धतीतून २५ टक्के कोट्यातील जागा भरण्याचा प्रयत्न करण्यात   आला. विहित मुदतीत अनेक बालकांनी प्रवेश घेतला नसल्यामुळे अनेक जागा रिक्त राहिल्या. या रिक्त जागांवर आॅनलाईन अर्ज सादर करणाºया बालकांना प्रवेश देण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी चवथी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राज्यातील ६९७२ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. यामध्ये अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्यातील ८८ याप्रमाणे यवतमाळ १७८, अकोला १२१, अमरावती २४३ आणि बुलडाणा २०८ अशा एकूण  ८३८ बालकांचा समावेश आहे. या बालकांना ११ ते २१ सप्टेंबर या कालावधीत संबंधित शाळेत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. निवड झालेल्या बालकांच्या पालकांना संबंधित पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पडताळणी समितीसमोर आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा तसेच संबंधित पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क न साधल्यास बालकांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.

मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ९ सप्टेंबर रोजी चवथी लॉटरी काढण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ८८ बालकांची निवड झाली. या बालकांनी प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपर्यंत संबंधित शाळा किंवा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.- अंबादास मानकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा