शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई: मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यात १०४९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 15:33 IST

जिल्ह्यातील एकूण ९३ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या ९४५ जागांसाठी जिल्हाभरातून १०४६ अर्ज पालकांनी सादर केले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आगामी शैक्षणिक सत्रासाठी आरटीई (शिक्षण हक्क अधिनियम) अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ९३ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केली असून, मोफत प्रवेशासाठी राखीव असलेल्या ९४५ जागांसाठी जिल्हाभरातून १०४९ अर्ज पालकांनी सादर केले आहेत. त्यात १०४६  आॅनलाईन, तर ३ मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात आले आहेत.समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतर्गत येणाऱ्या बालकांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, सीबीएसई, आयसीएसई व आयबीसह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहेत, अशा प्रकारच्या शाळा या प्रवेशासाठी पात्र आहेत. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळांना ४ मार्चपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याची मुदत होती. या मुदतीपर्यंत वाशिम जिल्ह्यातील ९३ शाळांनी नोंदणी केली आहे.यात वाशिम तालुक्यातील २९ शाळा, मंगरुळपीर तालुक्यातील १७, शाळा, मालेगाव तालुक्यातील १६ शाळा, कारंजा तालुक्यातील ११ शाळा आणि रिसोड तालुक्यातील ११ शाळांचा समावेश असून, या ९३ शाळांत मोफत प्रवेशासाठी ९४५ जागा राखीव आहेत. दरम्यान, मोफत प्रवेशासाठी पाल्यांचे अर्ज सादर करण्यास ५ मार्चपासून सुरुवात झाल्यानंतर १६ मार्चपर्यंत जिल्हाभरातील १०४९ पालकांनी अर्ज केले आहेत. त्यात आॅनलाईन  १०४६  आणि ३ मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात आले आहेत. पालकांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २२ मार्चपर्यंतची मुदत आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर लॉटरी प्रक्रिया राबवून पहिली सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान तांत्रिक कारणामुळे या वेळापत्रकातही भविष्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांकडून २५ मार्चपर्यंत आॅनलाईन व मोबाईलद्वारे अर्ज सादर करता येणार आहेत. यात अद्याप बदल झालेला नाही. पुढे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिल्यानंतर ते जाहीर करण्यात येईल.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि. प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा