शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वाशिम शहराच्या आकस्मीक पाणीपुरवठा योजनेसाठी ६ कोटी ८५ लक्ष रुपये मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 14:26 IST

वाशिम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे.पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे.

वाशिम - वाशिम जिल्हयात यावर्षी झालेल्या अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे, त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाई होवू  नये म्हणून,  आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री यांना ०६ आॅक्टोबर २०१७ रोजी लेखी पत्राव्दारे मौजे कोकलगाव बॅरेज मधून एकबुर्जी धरणात पाणी उपलब्ध करण्याकरिता निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. सदर बाब गंभीर स्वरुपाने घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस ६ कोटी ८५ लक्ष रुपयांच्या प्रस्तावास मंजुर दिली आहे. जिल्हयात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हयातील बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणारे एकबुर्जी धरणाची क्षमता ११.९७ द.ल.घ.मी. आहे, परंतु अपुºया पर्जणमानामुळे यावर्षी सदर धरणात  १.९० द.ल.घ.मी. एवढाचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाशिम शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ मौजे कोकलगाव येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज मधून पिण्याकरिता पाणी घेणे आवश्यक आहे. सदर नदीवरील बॅरेजवरुन तातडीची पाणीपुरवठा योजना तयार केल्यास भविष्यात वाशिम शहराला निर्माण होणारी पाणीटंचाई निर्माण होणार नाही, मौजे कोकलगाव ता.जि.वाशिम येथील पैनगंगा नदीवरील बॅरेज वरुन एकबुर्जी धरणापर्यंत पाणी उचल करण्याकरिता आवश्यक लागणारी पाईप लाईन, पंपींग मशीन, इतर अनुषंगीक कामे करुन घेण्याकरिता आमदार राजेंद्र पाटणी यांनी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावर दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सदर प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. व सदर योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत पुर्ण करणे बंधनकारक आहे, त्यामुळे शहरवासीयांना येत्या काळात पाणीटंचाईतून मुक्तता होणार आहे. सदर योजनेकरिता तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याबददल आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी