शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी तब्बल १९ .११ कोटी रूपयांचा निधी मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:03 IST

आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा: मतदार संघात काही गावातील डांबरी रस्त्यांची देखभाल दुरूस्ती रखडल्यामुळे अनेक रस्त्यांची चाळण झाली होती. ग्रामीण भागातील या मार्गावरून एस.टी.बसेस, अवैध वाहतुक, बैलगाड्या तसेच दुचाकी सारखी वाहने धावत असल्यामुळे अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली होती.   मतदार संघातील अशा रस्त्यांसाठी भरीव निधी युध्द पातळीवर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मतदार संघाचे  आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली.  तसेच यापुर्वी रस्त्याच्या कामासाठी १५ कोटी रुपए मंजुर करण्यात आले होते हे विशेष.यामध्ये कारंजा तालुक्यातील ग्राम धोत्रा, डोंगरगाव, पिंपळगाव, पिंप्री मोडक, हिवरा लाहे   येथील डांबरी रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी ११२ लक्ष रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. वापटी, लोणी अरब, वाढोणा, मेहा तसेच धनज येथील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १५८ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. याशिवाय लोणी अरब, निंभा जहाँ., दोनद, वडगाव रंगे या गावातील रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी १४० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. कारंजा ते धनज रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३१३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. कारंजा ते मोखड, कामरगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३८५ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. याशिवाय बोरगाव, म्हसला, बेलखेड, कामठा साठी ७० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला.तसेच मानोरा तालुक्यातील  गिंभा, कवठळ, बोरव्हा, रोहणा, कोलार, गिरोली, विळेगाव, शेंदुरजना, रूई  या रस्त्याच्या कामासाठी १४० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. मानोरा तालुक्यातीलच हातना, हातोली, आमदरी, रूई, मेंद्रा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३५ लक्ष , मानोरा ते तळप, कार्ली रस्ता  सुधारणा करण्यासाठी १८५ लक्ष रुपए मंजुर करण्यात आले. मानोरा ते गव्हा, रतनवाडी, रस्ता  सुधारणा करण्यासाठी २८० लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. तसेच कारंजा तालुक्यातील अनई, इंझा, येवता, मनभा ते प्रस्तावित प्रजिमा ३७ पर्यंत कि.मी. करिता १४३ लक्ष रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाRajendra Patniराजेंद्र पाटणी