शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद, बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रस्त्याची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 14:59 IST

रिसोड (वाशिम) : नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गाची वाट लागली आहे.

- विवेकानंद ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीत रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मार्गाची वाट लागली आहे. ९०० मीटर अंतराच्या या रस्त्यावर जवळपास ९०० खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव तांत्रिक कचाट्यात अडकला असून, नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयातून यावर तोडगा काढावा, असा सूर शहरवासियांमधून उमटत आहे.शहरातील प्रमुख मार्ग म्हणून सिव्हिल लाईन रस्त्याकडे पाहिले जाते. नगर परिषद  व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या रस्त्याची वाट लागली आहे. कालुशा दर्गा ते वाशिम नाका हा ९०० मिटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. नगर परिषदेला सदर रस्ता हस्तांतरीत करण्याचा  प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला आहे. परंतु दिलेल्या अटीमुळे हस्तांतरणाचा मार्ग सुकर झाला नाही. तांत्रिक अडचणीत हा प्रस्ताव अडकला आहे. ९०० मीटर अंतर असलेल्या या मार्गावर जवळपास ९०० खड्डे पडले आहेत. अगोदरच रस्ते अरुंद आणि त्यातही रस्त्यावर अतिक्रमण असल्याने वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. पथदिवे दुरूस्ती व अन्य कामांसाठी या रस्त्यावर नेहमीच खोदकाम राहत असल्याने रस्त्याची वाट लागली आहेपोलीस स्टेशन समोरील रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूने खोदकाम केले आहे तसेच काही दिवसांपूर्वी एका मोबाईल कंपनीने पंचायत समिती समोरील रस्ता खोदून ठेवला आहे. काही बांधकामधारकांची रेतीसुद्धा सदर रस्त्यावर आली आहे. त्यामुळे वाहन चालविणे ही एक कसरत ठरत आहे. सन २०१४ मध्ये दिड कोटी रुपये खर्च करून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. अल्पावधीच रस्ता खड्डामय झाला आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देणे आवश्यक ठरत आहे. केबल बदलण्याचे काम सुरू आहे. नवीन केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. -गणेश पांडेमुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड