शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोराळा जहाँगिर येथील रस्ता पुरात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:32 IST

बोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्दे कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोराळा जहॉगिर (वाशिम: : बोराळा जहॉगिर येथील शेतशिवाराला जोडणारे आणि लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आता शेतामध्ये जाणे कठीण झाले आहे.बोराळा धरणावरून जाणारा उजवा कालवा हा सहा किमीपर्यंत जातो. त्या कालव्याच्या दोन्ही पुलाखालून जाणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. ज्या रस्त्याने वाहने नेली जात होती. आता त्या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. चरायला नेण्यात येणारी कित्येक गुरे यामुळे घसरून पडली आहे. वहिवाटीचा रस्ताच वाहून गेल्याने आता खरीप हंगामातील काढलेला शेतमाल घरी कसा आणणार, पिकांची काढणी करण्यासाठी मळणीयंत्र, इतर वाहने कशी न्यावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. हा रस्ता वाहून जाण्यास दोन महिने उलटले तरी, पाटबंधारे विभाग किंवा इतर विभागाकडून त्याची दखल घेऊन रस्त्याचे काम अद्यापही करण्यात आले नाही. उडिद, मुग ही पिके काढणीवर आली आहेत, तर येत्या काही दिवसांतच सोयाबीनही काढणीवर येणार असून, शेतकºयांनी पिकांच्या काढणीची तयारीही केली आहे; परंतु वाहने नेण्यासाठी रस्ताच नसल्याने पिक शेतातच पडून राहण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतात पडलेल्या या शेतमालाचे करावे तरी काय, असाही प्रश्न शेतकरी उपस्थिती करीत आहेत. संबंधित अधिकाºयांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरीत या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी ग्रामपंचायत बोराळा जहॉगिर, शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

शेतशिवाराला जोडणारे रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले असून, शेतीची वहिवाटच बंद झाल्याने शेतकरी खूपच हतबल झाला आहे. शेतकºयांना शेतमाल आणण्यासाठी दुसरा मार्ग नाही. याचा विचार करून या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी. शेतमालाच्या काढणीला विलंब झाल्यास हा शेतमाल पाण्यामुळे ओला होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत.-गजानन जटाळे,सरपंच बोराळा जहॉगिर

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी