शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड पंचायत समिती कार्यालयात रोजगार सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 17:02 IST

एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देअमोल रमेश हाडे (वय ३५) हा गोहगाव हाडे ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे.पंचायत समिती कार्यालयात अमोल हाडे याने तेथे येवून सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले.हेड कॉन्स्टेबल संजय आमटे व पो. कॉ. सुनिल पवाने यांनी तत्काळ अमोलला ताब्यात घेऊन रिसोेड ग्रामिण रुग्णाालयात उपचारार्थ दाखल केले.

रिसोड : तालुक्यातील गोहगाव हाडे ग्रामपंचायतकडून कामकाजादरम्यान मानसिक त्रास होत असल्याचे कारण समोर करून एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे रिसोड शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, अमोल रमेश हाडे (वय ३५) हा गोहगाव हाडे ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे. गत काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली वावरत होता. त्याच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतमधील काही सदस्य त्यास चुकीच्या पद्धतीने स्वाक्षरी करण्यास दबाव टाकत मानसिक त्रास देत होते. याबाबत अमोलने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे रितसर तक्रार करून २ आॅक्टोबर रोजी आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेवून रिसोड पोलिस स्टेशनचे कर्मचारी गत दोन दिवसांपासून अमोलच्या शोधात होते. अशातच आज गांधी जयंती साजरी करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाºयांसह अन्य कर्मचारी उपस्थित झाले असताना अमोल हाडे याने तेथे येवून सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले. यादरम्यान तेथे तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल संजय आमटे व पो. कॉ. सुनिल पवाने यांनी तत्काळ अमोलला ताब्यात घेऊन रिसोेड ग्रामिण रुग्णाालयात उपचारार्थ दाखल केले. गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांनीही रुग्णालयात धाव घेवून अमोलच्या प्रकृतीची वास्तपुस्त केली. अमोल हाडे याचा ग्रामपंचायत सदस्यांची अंतर्गत वाद असून त्यातूनच त्याने मंगळवारी विषारी औषध प्राशन केले. त्याने दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात ‘आॅनलाईन’ तक्रार केली होती. त्यानुसार, त्यास संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला; परंतु तो झाला नाही. अशातच आज त्याने पंचायत समितीत येवून अचानक हे पाऊल उचलले. याबाबत पंचायत समिती स्तरावरून चौकशी केली जाईल.- शिवशंकर भारसाकळेगटविकास अधिकारी, पंचायत समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड