शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड नगर परिषद निवडणुक : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयमाला आसनकर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:04 IST

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. दुसºया स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.रिसोड नगर परिषद सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यंदा प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवडणूक झाली. यावेळी पहिल्यांदाच प्रमुख पक्षांनी ही निवडणूक पक्षाच्या चिन्ह्यावर लढविली. यापूर्वी स्वतंत्र आघाडी, महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. सोमवार १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. नगराध्यक्ष आणि एकूण १० प्रभागातून २० नगर सेवक पदासाठी ही निवडणूक झाली. अटितटीच्या या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनविकास आघाडीच्या विजयमाला कृष्णा आसनकर यांना सात हजार ६४२ मते, भारिप-बमसंच्या शेख नजमाबी ख्वाजा यांना चार हजार ९८८, शिवसेना, भाजपा, शिवसंग्राम महाआघाडीच्या ज्योती अरूण मगर यांना दोन हाजार ६२१, अपक्ष मंगला किरण क्षीरसागर यांना एक हजार १९० तर काँग्रेसच्या शितल बंडू वानखेडे यांना ९५६ मते मिळाली. आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. मतमोजणीनंतर आक्षेप घेण्यात आल्याने फेरमतमोजणी घेण्यात आली. यामध्ये आसनकर यांची २६५४ मतांची आघाडी कायम राहिली.दरम्यान, नगर सेवक पदांच्या निवडणुकीत वाशिम जिल्हा जनविकास आघाडीचे ९ नगरसेवक विजयी झाले. काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे.भाजपाचे खातेही उघडले नाहीनगर परिषद निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसंग्राम अशी महाआघाडी होती. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे उमेदवार उभे होते तर नगरसेवक पदासाठी भाजपाचे १४ उमेदवार उभे होते. भाजपाच्यावतीने खासदार संजय धोत्रे, अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा, माजी आमदार विजयराव जाधव यांनी रिसोडात प्रचारसभाही घेतल्या. विजयराव जाधव तर रिसोड येथे तळ ठोकून होते. सोमवारी जाहिर झालेल्या निकालात नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकाही ठिकाणी भाजपाचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. खातेही उघडले नसल्याने हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.शिवसेना तिसऱ्या क्रमांकावरनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी खासदार भावना गवळी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. सोबत भारतीय जनता पार्टी, शिवसंग्राम पक्षाची रसद असतानाही, या महाआघाडीच्या उमेदवाराला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर महाआघाडीचा उमेदवार लढतीतही नसल्याचे दिसून येते.बॉक्स..काँग्रेस उमेदवाराची ह्यअनामतह्ण जप्तनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पाचव्या क्रमांकावर आहे. केवळ ९५६ मते असून, अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. नगर परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेस जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी मंत्र्यांनी रिसोड येथे हजेरी लावून प्रचार रॅलीही काढली होती. या रॅलीला मिळालेला प्रतिसाद हा मतदानात परावर्तीत झाला नसल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडElectionनिवडणूक