शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यू : चवथ्या दिवशीही रिसोड बाजारपेठ बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 16:37 IST

चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. 

रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड शहरात ५ सप्टेंबरपासून ‘जनता कफ्यू’ची हाक देण्यात आली. चवथ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रिसोडकरांची चिंताही वाढत आहे. बाहेरगावावरून परतलेल्या नागरिकांमुळे रिसोड शहरात १्२ जून रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. कोेरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जून महिन्यात व्यापारी व शहरवासियांनी चार दिवस जनता कर्फ्यू तसेच जुलै महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार सात दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात ‘अनलॉक-४’चा टप्पा सुरू होताच, शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी महासंघ व नगर परिषदेने ५ सप्टेंबरपासून जनता कर्फ्यूची हाक दिली. चवथ्या दिवशीही ८ सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. दरम्यान, ९ सप्टेंबरपासून बाजारपेठ पूर्ववत होणार असून, दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघ व नगर परिषदेने घेतला. त्यानुसार बुधवारपासून दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन व्यापारी व नगर परिषदेने केले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड