शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड बाजार समिती संचालक पदावरून तेजराव वानखेडे पायउतार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:13 IST

पोलीस पाटील या शासकीय पदावर कार्यरत असल्याने तेजराव वानखेडे हे बाजार समितीवर सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : पोलीस पाटील पदावर कार्यरत असताना रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद भूषविता येत नाही, असे स्पष्ट करीत पणन संचालकांनी तेजराव वानखेडे यांना बाजार समितीचे संचालक पदावरून कमी करण्यात येत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ३० मे रोजी दिला, अशी माहिती संचालक घनश्याम मापारी यांनी १० जून रोजी दिली. यासंदर्भात घनश्याम भीमराव मापारी यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली होती.सन २०१५ साली रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. ग्राम पंचायत मतदारसंघातून अर्जदार घनश्याम मापारी हे निवडून आलेले आहेत. गैरअर्जदार तेजराव जनार्धन वानखेडे हे सुद्धा २०१५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आले. तेजराव वानखेडे यांच्याकडे कुकसा या गावाचे पोलीस पाटील पद आहे. त्यामुळे ते बाजार समितीवर सभासद म्हणून राहण्यास अपात्र असून, त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे यासंदर्भात मापारी यांनी अ‍ॅड. व्ही.बी. हेरोळे यांच्यामार्फत पणन संचालकांकडे अर्ज सादर केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पणन संचालक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी वानखेडे यांना अपात्र घोषित केले आहे. पणन संचालकांच्या आदेशात म्हटले की, रिसोड बाजार समितीवर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडून आलेले तेजराव वानखेडे हे कुकसा गावचे पोलीस पाटील असल्याचे दाखल कागदपत्रावरून दिसून येते. निवडणुक नियमातील तरतुदीनुसार व कायद्यातील शेतकरी या संज्ञेच्या व्याखेत ते बसत नाही. त्यामुळे बाजार समितीवर सभासद म्हणून राहण्यास ते अपात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत अर्जदारांचे अपिल अर्ज मंजूर केला. पोलीस पाटील या शासकीय पदावर कार्यरत असल्याने तेजराव वानखेडे हे बाजार समितीवर सदस्य म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यांना बाजार समितीचे सदस्य या पदावरून कमी करण्यात येत आहे, असा आदेश पणन संचालकांनी दिला. यामुळे बाजार समितीसह सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMarket committee washimबाजार समिती वाशिम