लस घेण्याचे आराेग्य विभागाचे आवाहन
वाशिम : जिल्हाभरात सध्या कोरोनापासून रक्षण व्हावे, यासाठी नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार, प्रत्येकाने लस घेऊन सुरक्षित व्हावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी केले.
गावठाण सर्वेक्षण कामास गती
वाशिम : गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करा. त्यासाठी तालुकास्तरीय समिती सदस्यांनी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन करण्यात आले. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत असून, सर्वेक्षण कामास गती प्राप्त झाली.
आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन
वाशिम : व्हायरल फिव्हरपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत आरोग्य विभागातर्फे चिखली परिसरात मार्गदर्शन करण्यात आले. फिव्हरपासून संरक्षण कसे करता येईल, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थींसाठी चार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी बुधवारी केले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून ई-पीक पाहणी
वाशिम : जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी वाशिम तालुक्यातील नगठाणा येथील शेतात भेट देऊन ई-पीक पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार विजय सावळे व तलाठी बोरकर उपस्थित होते.