शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड नगर परिषदेवर जनविकास आघाडीचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी विजयमाला आसनकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 17:02 IST

रिसोड (वाशिम) : नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषद निवडणुकीचा निकाल सोमवार, १० डिसेंबर रोजी जाहिर झाला असून, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवार विजयमाला कृष्णा आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानावर भारिप-बमसं तर सेना, भाजपा महाआघाडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सोमवार, १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात झाली. नगराध्यक्ष आणि एकूण १० प्रभागातून २० नगर सेवक पदासाठी ही निवडणूक झाली. अटितटीच्या या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीच्या  नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या नऊ जागा विजयी झाल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनविकास आघाडीच्या विजयमाला कृष्णा आसनकर यांना सात हजार ६४२ मते, भारिप-बमसंच्या शेख नजमाबी ख्वाजा यांना चार हजार ९८८, शिवसेना, भाजपा, शिवसंग्राम महाआघाडीच्या ज्योती अरूण मगर यांना दोन हाजार ६२१, अपक्ष मंगला किरण क्षीरसागर यांना एक हजार १९० तर काँग्रेसच्या शितल बंडू वानखेडे यांना ९५६ मते मिळाली. आसनकर यांनी २६५४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.  नगरसेवक पदाच्या निवडणुकीत जनविकास आघाडीने २० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ९ उमेदवार विजयी झाले. नगर परिषदेत सर्वात मोठी आघाडी म्हणून जनविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये निवडून आलेले दोन अपक्ष उमेदवारही जनविकास आघाडीचेच असल्याचा दावा करण्यात आला.

असे आहे पक्षीय बलाबल ---जनविकास आघाडी - नगराध्यक्षपक्षनिहाय नगरसेवकजनविकास आघाडी - ९ काँग्रेस - ३ शिवसेना - ३अपक्ष - ३भारिप-बमसं - २

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडElectionनिवडणूक