शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल दरवाढीचा फटका उपाहारगृहांना; पदार्थांचे दर दीडपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:28 IST

Restaurants rise rates of refreshments दरवाढीची कसर काढण्यासाठी फराळाच्या पदार्थांचे दर दीडपट केल्याने आता ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली आहे.

ठळक मुद्दे गेल्या दीड महिन्यांपासून अन्नधान्यासह तेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. उपाहारगृह चालकही या दरवाढीमुळे अडचणीत आले आहेत.पदार्थांचे दर दीडपट वाढविल्यामुळे ग्राहकांनी आता नाश्त्याकडे पाठ केल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सोयाबीन तेलाचे दर १२५ रुपये प्रती किलोवर पोहोचल्याने उपहारगृह चालकांची पंचाईत झाली आहे. या दरवाढीची कसर काढण्यासाठी फराळाच्या पदार्थांचे दर दीडपट केल्याने आता ग्राहकांनी उपाहारगृहांकडे पाठ केली आहे. तेलाच्या दरवाढीमुळे पूर्वीच्या दरात फराळाचे पदार्थ विकणे परवडणारे राहिले नाही, तर पदार्थांमधील दरवाढीने ग्राहक फिरकेनासे झाल्यामुळे उपाहारगृह चालक संकटात सापडले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून अन्नधान्यासह तेलाच्या दरात सतत वाढ होत आहे. यामुळे सर्वसाधारण जनता त्रस्त असताना उपाहारगृह चालकही या दरवाढीमुळे अडचणीत आले आहेत. प्रामुख्याने हरभरा डाळ, मूग डाळीसह शेंगदाणा, साबूदाणा, मैदा, आदिंसह सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या अन्नधान्यापासून तयार केल्या जाणाºया पदार्थांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी मुंगवडा, समोसा, कचोरी, भजे, आलूवड्यासह साबूदाणा वडा, जिलेबी आणि फरसानाच्या दरात वाढ केली आहे. फरसान आणि जिलेबी वगळता इतर पदार्थांचे दर दीडपट वाढविल्यामुळे ग्राहकांनी आता उपाहारगृहातील नाश्त्याकडे पाठ केल्याचे दिसत आहे. यामुळे उपहारगृह चालक पुरते संकटात सापडले आहेत. अन्नधान्य आणि तेलदरवाढीमुळे त्यांची स्थिती इकडे आड तिकडे विहिर अशी झाली आहे. उपाहारगृहातील पदार्थांचे तुलनात्मक दरपदार्थ                     पूर्वीचे                 आताचे  समोसा १ नग         १० रुपये           १५ रुपयेकचोरी १ नग         १० रुपये           १५ रुपयेआलूवडा              १० रुपये           १५ रुपयेमुंंगवडा                 १० रुपये           १५ रुपयेभजे ५० गॅ्रम           १० रुपये           १५ रुपयेमिसळ १ प्लेट        १५ रुपये           २० रुपये 

 उपाहागृहातील पदार्थ तयार करण्यासाठी लागणाºया कच्च्या मालाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुंग डाळ, हरभरा डाळ, मैदा, साबूदाणा, शेंगदाण्यासह तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने फराळाच्या पदार्थांचा खर्च वाढला आहे. त्यात आता ग्राहकांची संख्या घटत असल्याने आमचा व्यवसायच संकटात सापडला आहे.-पुनम बिष्णोई, उपाहारगृह चालक

टॅग्स :washimवाशिमhotelहॉटेल