शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त भागात टँकर मंजूरीचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:10 IST

वाशिम : दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत.

वाशिम : दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाºयांकडे सुपूर्द केले आहेत. अन्य जिल्हे व तालुक्यांमध्येही टँकसर््चे मंजूरीचे अधिकार उपविभागीय अधिकाºयांना प्रदान करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आला आहे. यापूर्वी टँकर्स् मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांकडे होते.कमी पर्जन्यमानामुळे राज्यातील १५१ तालुक्यांसह २६८ महसूल मंडळांमध्ये दूष्काळ घोषित करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका तसेच मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दोन महसूल मंडळांचा समावेश आहे. दूष्काळी परिस्थिती निवारणार्थ या भागात विविध उपाययोजनाही लागू करण्यात आलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याला विलंब होऊ नये म्हणून टँकसर्् मंजूर करण्याबाबतचे अधिकार महसूल विभागाने संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाºयांना २९ नोव्हेंबरच्या आदेशान्वये बहाल केले आहेत. यापूर्वी टँकसर्् मंजूरीचे अधिकार हे जिल्हाधिकाºयांकडे होते. दुष्काळ घोषित केलेल्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याचे टँकसर्् मंजूर करण्याचे अधिकार आवश्यकतेनुसार उपविभागीय अधिकाºयांना प्रदान करण्याची जबाबदारीही विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. 

दुष्काळी परिस्थितीत टँकसर्् मंजूरीसंदर्भात शासनाच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक