शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Right To Education : ९७६ पैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 15:57 IST

निवड झालेल्या ९७६ बालकांपैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश १२ जुलैपर्यंत झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत खासगी प्राथमिक शाळेत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९७६ बालकांपैकी केवळ १३१ बालकांचे प्रवेश १२ जुलैपर्यंत झाले आहेत. यावर्षी शाळा स्तरावरच कागदपत्रांची पडताळणी असूनही यासाठी पालक येत असल्याचे दिसून येत आहे. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आल्याने तेव्हापासून शाळांना सुट्या आहेत. यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही कोरोनामुळे ३१ जुलैपर्यंत वर्ग सुरू होणार नाहीत. तथापि, प्रवेश प्रक्रिया व अन्य प्रशासकीय कामकाज सुरू आहे. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात १०१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, एकूण प्रवेशित जागा १०११ आहेत. यासाठी २२५६ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून एकूण ९७६ बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. प्रवेश घेण्यासाठी यावर्षी संबंधित शाळा स्तरावरच आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया असून, त्यानंतर प्रवेश दिला जात आहे.  निवड झालेल्या बालकांच्या मोबाईलवर १५ दिवसांपूर्वीच संदेशही पाठविण्यात आले. १२ जुलैपर्यंत केवळ १३१ बालकांचे मोफत प्रवेश होऊ शकले. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा