शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारचा तांदूळ अन्यत्र आढळला; गोडावूनला सील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 16:01 IST

सदर गोडावूनला सील ठोकले असून, शिक्षण विभागातर्फे ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ व अन्य धान्य वाशिमनजीकच्या एका गोडावूनमधून अन्यत्र ट्रकने नेत असल्याच्या संशयावरून पोलीस व शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी पकडला. सदर गोडावूनला सील ठोकले असून, शिक्षण विभागातर्फे ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढविणे, आहारातून पोषक तत्वे मिळावी, गरजू विद्यार्थ्यांना शाळेतच मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेता यावा या उद्देशातून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून संबंधित शाळांना आवश्यक त्या अन्नधान्याचा पुरवठा दरमहा नियोजित तारखेला केला जातो. वाशिम ते अकोला या महामार्गानजीक वाशिम शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या एका गोडावूनमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गतचा तांदूळ व अन्य धान्य असल्याची गुप्त माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस स्टेशनला दिली होती. यावरून वाशिम शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घटनास्थळ गाठून पाहणी केली. तेथे तांदळाचे काही पोते भरून असलेल्या एक ट्रक आढळून आला. काही वेळाने प्राथमिक शिक्षण विभागाच्या चमूने घटनास्थळी भेट देऊन पंचमाना केला. सदर गोडावूनला सील ठोकले असून, पुढील कार्यवाहीसाठी पुरवठा विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सदर प्रकरण वर्ग केले जाणार आहे. दरम्यान शिक्षण विभागातर्फे वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनलाही तक्रार देण्यात आली. त्यानुसार हा तांदूळ नेमका शालेय पोषण आहार योजनेतील आहे की नाही, याची शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दुजोरा दिला.

टॅग्स :washimवाशिम