शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेतील कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:30 IST

उंबर्डा बाजार  ( वाशिम ) :  पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक वारंवार घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क उंबर्डा बाजार  ( वाशिम ) :  पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक वारंवार घेत आहेत. या अंतर्गत त्यांनी ७  मे रोजी कारंजा तालुक्याचा दौरा करून कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उंबर्डा बाजार येथे सुरू असलेल्या श्रमदानस्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले, तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना सुचना केल्या.वॉटर कप स्पर्धेला ८ एप्रिल पासून सुरूवात झाली असून, जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील मिळून १२० गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. त्यात कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे वॉटरकप स्पर्धेंतर्गत जलसंधारणासाइी श्रमदान करण्यास ग्रामस्थ उत्साही दिसत आहेत. याच गावात सुरू असलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी ७ मे रोजी केली. यावेळी कारंजाचे तहसिलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी कालीदास तापी, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, वनपरिक्षेत्र अधिकारी इढोळे व संबंधित विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक नानोटे यांनी केले कार्यक्रमात सरपंच वनिता रामदास नागोलकर,  सिध्दार्थ देवरे, चंद्रकांत चिरडे, लालमहोम्मद, भारत कानडे आदींनी ग्रामस्थांच्या वतीने समस्या मांडल्या. कार्यक्रमाचे संचलन पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक लोखंडे यांनी तर आभार प्रदर्शन पाणी फाउंडेशनचे विठ्ठल दांडगे यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा