शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

कृषी विकास प्रकल्पाचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:01 AM

वाशिम: समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचा आढावा विभागीय आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठी  प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पीयूष सिंह यांनी दिल्या.

ठळक मुद्देव्यवसाय उभारणीसाठी मिळणार प्रोत्साहन बीज प्रक्रिया केंद्राची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचा आढावा विभागीय आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठी  प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पीयूष सिंह यांनी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक राजू इंगळे, जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे यांच्यासह संबंधित क्लस्टरच्या अंमलबजावणी यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकर्‍यांना रेशीम शेती, मत्स्यशेतीसारखे शेतीपूरक व्यवसाय सुरू करून अतिरिक्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्‍यांना समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रोत्साहित करा. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची माहिती जास्तीत जास्त शेतकर्‍यांना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या. समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सहा क्लस्टरमध्ये राबविण्यात असलेल्या उपक्रमांचा तसेच नियोजित कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी शेलगाव बोंदडे येथील बीज प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. समन्वयित कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेलगाव बोंदडे (ता. मालेगाव) येथे  बीज प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली. या केंद्रावर सध्या हरभरा बीज प्रक्रिया सुरू असून, याबाबत समन्वयित कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, केंद्राचे अध्यक्ष उमेश वाजूळकर यांनी माहिती दिली. परिसरातील ८ गावांमधील ३४0 शेतकर्‍यांच्या साहाय्याने हरभरा बीजोत्पादन घेण्यात येत असून, वाशिमसह हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातही या केंद्रातील बीज प्रक्रिया केलेले बियाणे विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.