शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचारी संपावरच; कामाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:43 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन १३ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. गत चार दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने महसूलचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. 

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय संपावर तोडगा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने १० आॅक्टोबरपासून पुकारलेले काम बंद आंदोलन १३ आॅक्टोबरलादेखील सुरूच होते. गत चार दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने महसूलचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक पद सरळसेवेने भरल्यास महसुल विभागातील अव्वल कारकुन दर्जाचे कर्मचा-यावर अन्याय होणार असून अनेक अव्वल कारकुन संवर्गातील कर्मचारी यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाचे परिपत्रकान्वये दिलेल्या पदभरतीच्या सुचनेला स्थगिती देण्यात यावी तसेच कनिष्ठ लिपिक पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवेने न भरता पदोन्नतीने भरणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, ५ दिवसाचा आठवडा करणे, अव्वल कारकून संवर्गाची वेतन त्रुटी दूर करणे, आकृतीबंधाबाबत सकारात्मक निर्णय घेणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती तात्काळ देणे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे महसूलविषयक कामकाज ठप्प झाले आहे. हा संप वाशिम जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांच्यासह सुनील घोडे, अनिल घोडे, अरविंद करंगळे, अतूल देशमुख, जीवन मोरे, गणेश ढोरे, अरविंद पारवे, प्रशांत देशपांडे, किरण आमनोरे, बबनराव व्यवहारे, महिला प्रतिनिधी अर्चना घोळवे, रंजना अडकिने आदींनी केला आहे.