वाशिम : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम व्यवसायावर झाला असून दुपारच्यावेळी शहरातील जवळपास सर्वच दुकाने बंद राहत आहेत.उन्हात नागरिक घराबाहेर निघत नसल्याने व्यवसायीक ग्राहकांची प्रतिक्षा करत असतांनाच आता व्यावसायिकांनी सुध्दा दुपारी दिड ते दोन वाजताच्या दरम्यान आपली प्रतिष्ठाने बंद करणे सुरु केले आहे. दुपारी बंद केलेली दुकाने उन्हाचापारा कमी झाल्यानंतर ४ ते ५ वाजता उघडतांना दिसून येत आहेत. तर लघुव्यावसायिक सुध्दा रस्तयाच्या कडेला आपल्या हातगाडया उभ्या करुन सावलीमध्ये बसतांना दिसून येत असल्याचे चित्र आहे. वाढत्या उन्हामुळे व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.
वाढत्या उन्हाचा व्यवसायावर परिणाम
By admin | Updated: April 24, 2017 20:50 IST