कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पी.एस. खंदारे (अंनिस प्रमुख) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खंदारे म्हणाले, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचा मुख्य उद्देश हा शोषण मुक्त समाज निर्माण करणे आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अनेक शतकांपासून समाजावर अंधश्रद्धेचा पगडा आहे. अंधश्रद्धेने गरीब जनतेची पिळवणूक होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रयत्नातून जादूटोणा कायदा पारित झाला. भूत, भानामती करणे, चमत्कार करणे, गुप्तधन, नरबळी, चेटूक करणे अशा माध्यमातून लोकांना भीती घालणे यासाठी कायद्यान्वये शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. जयश्री देशमुख यांनी अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा हा समाजामध्ये सकारात्मकता वातावरण निर्मितीचे कार्य करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पंढरी गोरे यांनी केले. परिचय प्रा. विजय वानखेडे यांनी करून दिला. मयूरी अवताडे हिने सूत्रसंचालन केले. प्रा. प्रसेनजीत चिखलीकर यांनी आभार मानले.
जादूटोणा प्रतिबंधक कायद्यावर कार्यशाळेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:18 IST