शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेत प्रयोगशाळा, ग्रंथालय उभारणीचा संकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:44 IST

नववर्षात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, हा गैरसमज खोडून काढण्यासाठी शिक्षण विभाग सरसावला असून नववर्षात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ प्राथमिक शाळा तर ५ कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण ७७८ शाळा आहेत. या शाळांमध्ये प्राप्त शासन निधीतून टप्प्याटप्प्याने भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. नाविण्यपूर्ण व अभिनव उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. वाशिम तालुक्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेला तर आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळाला आहे. भव्य प्रांगणात ही शाळा लवकरच उभारली जाणार असून यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. वाशिम जिल्हयाचा समावेश हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असल्याने शिक्षण व आरोग्यावर विशेष भर दिला जात आहे. आकांक्षित जिल्हा म्हणून शासनाकडून भरीव स्वरुपात निधी मिळावा याकरीता शिक्षण विभागाने आराखडा तयार केला असून, त्याअनुषंगाने टप्प्याटप्प्याने निधी मिळाल्यास जिल्हा परिषद शाळांमध्ये बऱ्यापैकी भौतिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.नववर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व ७७८ शाळांना डिजिटलची जोड देण्याबरोबरच सर्व शाळांमध्ये विद्युत जोडणीची सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असल्याचेही मानकर म्हणाले. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे याकरीता वॉटर फिल्टरची सुविधा, स्वच्छतागृह उभारणे प्रस्तावित आहे. दुरूस्तीसह इमारती सुसज्ज करण्यावरही भर राहणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोड निर्माण व्हावी तसेच साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.नववर्षात या प्रस्तावाला मंजूरी मिळेल, असा विश्वासही शिक्षणाधिकारी मानकर यांनी व्यक्त केला. प्रयोगशाळेमुळे केंद्र स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करणे शक्य होईल तसेच विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना व्यासपिठ मिळेल, असा आशावाद शिक्षण विभाग बाळगून आहे. अध्ययन क्षमता निष्पत्तीनुसार अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर भर देण्यात येणार आहे. खासगी शाळेच्या बरोबरीत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.विद्युत देयक रखडल्यामुळे शाळांचा वीजपुरवठा खंडीत होतो. परिणामी ई-लर्निंग व डिजिटल शाळा संकल्पनेला तडा जातो. ही गैरसोय टाळण्यासाठी ग्राम पंचायतींनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज देयकासाठी तरतूद करावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा