शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलदुतांचा पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:40 IST

रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:   पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत असलेला ºहास आणि त्यामुळे मानवी जीवनावर होत असलेला परिणाम लक्षात घेत. जिल्ह्यातील रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित या जलदुतांनी पर्यावरणवृद्धीसाठी वृक्षारोपण व्हावे म्हणून जिल्हाभरात पाच लाख वृक्षबिया वाटपाचा संकल्प केला आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वितरण करीत आहेत. रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित हे दोन जलदूत शासनाच्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन गावागावांत जलजागृती करण्यासह गावकºयांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. जलसंधारणासह पर्जन्यमान वाढीसाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोघे आपापल्या गावांत वृक्ष लागवड मोहिम राबवित आहेतच शिवाय वृक्ष लागवडीसाठी जनतेला प्रोत्साहित करीत आहेत. जिल्ह्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी म्हणून ते विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातील एक भाग म्हणून त्यांनी जिल्हाभरात पाच लाख वृक्ष बिया वितरीत करण्याचा संकल्प केला आहे.  या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली असून, विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत जाऊन ते वृक्षबियांचे वाटप करीत आहेत. या वृक्षबिया रुजवून वृक्षरोपे तयार करण्यासह त्यांची लागवड करण्याचे आवाहनही ते संबंधितांना करीत आहेत. शासनाच्या वृक्ष लागवड योजनेला हातभार लागावा, तसेच जिल्ह्यात निर्धारिक उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्षांची लागवड व्हावी म्हणून जलदूत अरविंद उचित आणि रविंद्र इंगोले विविध ठिकाणी पायपीट करीत वृक्षलागवडीसाठी जनतेला पे्ररित करीत आहेत. यासाठी त्यांनी  वृक्षबिया वितरणाचा संकल्प केला असून, प्रत्येक ठिकाणी केवळ पाच वृक्षबिया ते वाटप करीत आहेत. या वृक्षबियांच्या वितरणासाठी त्यांनी पाकिटे तयार केली आहेत. पाकिटे घेऊन ते विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, निमशासकीय संस्था, महिला बचतगटांकडे जात आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. वृक्षबिया रुजवून त्यांची जोपासना केल्यास वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असा सल्ला ते प्रत्येकाला देऊन वृक्ष लागवडीस प्रेरित करीत आहेत. 

 गावोगावी जनजागृती करणारराज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात निर्धारित उद्दिष्टापेक्षा खूप अधिक वृक्ष लागवड व्हावी आणि खºया  वाशिम जिल्हा पर्यावरण संवर्धनात अग्रेसर व्हावा म्हणून जलदूत रविंद्र इंगोले आणि अरविंद उचित यांनी जिल्हाभरातील गावागावांत वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करण्याचेही ठरविले आहे.

टॅग्स :washimवाशिम