शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच पदाचे आरक्षण रद्द; इच्छुकांचा हिरमोड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 12:14 IST

Gram Panchayat Election News निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  सरपंच पदासाठी यापूर्वी काढण्यात आलेली आरक्षण सोडत शासन निर्णयानुसार रद्द झाली असून, यामध्ये निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचादेखील समावेश आहे. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला तर सरपंचपदाचे आरक्षण कोणत्याही प्रवर्गासाठी निघू शकेल ही शक्यता लक्षात घेता, निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५ व मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला. दरम्यान, जिल्ह्यात सरपंच पदासाठी ७ डिसेंबर आणि महिला सरपंचपदासाठी १० डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. सरपंच पदावर डोळा ठेवून अनेकांनी त्या दृष्टीने फिल्डिंगही लावली. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच आरक्षण जाहीर केल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने शासनाने यापूर्वी काढण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द केली. यामध्ये जिल्ह्यात होऊ घातलेल्या १६३ ग्रामपंचायतींचादेखील समावेश आहे. आरक्षण सोडत रद्द झाल्याने सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला तर यापूर्वीच्या आरक्षण सोडतीने ज्यांना सरपंच पदापासून वंचित राहावे लागणार होते, त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. निवडणुकीनंतर आरक्षण सोडत निघणार असल्याने  चुरस निर्माण होण्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यात ७ व १० डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. शासन निर्णयानुसार ही आरक्षण सोडत रद्द झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या १६३ ग्रामपंचायतींचादेखील समावेश आहे. निवडणुकीनंतरच आता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.- सुनील विंचनकरप्रभारी, जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक