शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषीसेवा केंद्रांच्या परवाने नुतनीकरणाची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 16:53 IST

परवाने नुतनीकरणासह इतर प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडेच केली आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कृषीसेवा केंद्रांना दरवर्षी कृषी निविष्ठांच्या विक्रीसाठी दर दोन वर्षांनी परवान्यांचे नुतनीकरण करावे लागते. यंदाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती; परंतु लॉकडाऊनमुळे आॅनलाईन कामकाजही बंद पडल्याने मुदत संपली तरी राज्यातील कृषीसेवा केंद्रांच्या परवान्यांचे नुतनीकरण होऊ शकले नाही.शासनाच्या नियमानुसार बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना दर दोन वर्षांनी परवान्यांचे नुतनीकरण करावे लागते, तसेच हव्या असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी उगम प्रमाणपत्र व खतांच्या विक्रीकरीता ‘ओ फॉर्म’ भरावे लागतात. त्याशिवाय किटकनाशकांच्या विक्रीसाठी नुतनीकरणाची गरज नसली तरी, दरवर्षी विके्रत्यांना संबंधित कंपनीच्या प्रिंसीपल सर्टिफिकेटची जोडणे अनिवार्य असते. यंदाही राज्यातील बहुतांश कृषीसेवा केंद्र वा कृषी निविष्ठांची विक्री करणाऱ्यांना ही प्रकिया पूर्ण करणे आवश्यक होते. साधारणत: मार्च ते एप्रिलदरम्यान ही प्रक्रिया पार पाडावी लागते. तथापि, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर १४ मार्चपासून लॉकडाऊन जारी झाल्याने सर्व कृषी निविष्ठा कंपन्यांचे कार्यालय बंद असल्याने, तसेच कुरियर सेवाही बंद असून, आॅनलाईन कामकाजही बंद असल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांना उगम प्रमाणपत्र व खतांच्या विक्रीकरीता ‘ओ फॉर्म’सह प्रिंसीपल सर्टिफिकेटची पूर्तता करणे कठीण झाले आहे. यामुळे आगामी खरीप हंगामात परवाने नुतनीकरणाच्या अभावासह उगम प्रमाणपत्र आणि प्रिसीपल सर्टिफिकेट न मिळाल्यास कृषी निविष्ठांच्या विक्रीत अडचणी येणार आहेत. त्यामुळे राज्यातील कृषी निविष्ठा विके्रत्यांनी परवाने नुतनीकरणासह इतर प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडेच केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र